मुखपृष्ठ Top News भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची यादी केली जाहीर

भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची यादी केली जाहीर

by sitemanager

नवी दिल्ली ;- सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकींचा माहोल पाहायला मोहीत असून लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपने तीन राज्यातील ९ उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जाहीर केली.

यादीमध्ये चंदीगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील ९ मतदारसंघाचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिलेला आहे. हा नारा पार करण्यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. या अनुषंगानेच आज भाजपाच्या उमेदवारांची दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे.

चंदीगडमधून संजय टंडन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एस.एस.अहलुवालिया यांना उमेदवारी देण्यात आली. तर उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबी-विनोद सोनकर, फुलपूर-प्रवीण पटेल, इलाहाबाद-नीरज त्रिपाठी, बलिया-नीरज शेखर, मछलीशहर-बी.पी.सरोज, गाजीपूर-पारस नाथ राय यांना संधी देण्यात आली आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या