साप्ताहिक राशीभविष्य

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणानी (NIA) दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने एका संशयित दहशतावाद्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता. या अतिरेक्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्र एटीएसची टीम इंदूरमध्ये दाखल झाली आहे. गोपनीय अहवालाच्या आधारावर त्याला अटक केली आहे. त्या संशयित दहशतवाद्याचे नाव सरफराज मेमन आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्फराजने चीन, चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतले आहे. तो भारतात मोठ्या हल्ल्याची योजना तयार करत होतो, असे एनआयएच्या अहवालात म्हटले आहे. या माहितीच्या आधारे NIA ने पोलिसांना सतर्क राहण्याचं आवाहनही केलं होते. NIA च्या माहितीच्या आधारे मुंबई पोलीस, एटीएस तसेच इतर यंत्रणाकडून तपास सुरु होता, आता त्यामध्ये यश आलं असून पोलिसांनी संशयित सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे.

मुंबई पोलिसांना NIAने पाठविला मेल

एनआयएकडून मुंबई पोलिसांना एक मेल आला होता. या मेलमध्ये सरफराज मेमन यांच्याबद्दल माहिती देण्यात आली होती. एनआयएकडून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जो मेल आला आहे, त्या मेलमध्ये सरफराज हा मध्यप्रदेशमधील इंदोरचा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे याबाबत मध्यप्रदेश सरकारला देखील माहिती देण्यात आली होती. हा व्यक्ती भारतासाठी धोकादायक असल्याचं या मेलमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे लायन्स, परवाना, व्हिसा यासह आधार कार्डची प्रतही मुंबई पोलिसांना मेल करण्यात आली होती.

0 FacebookTwitterWhatsappEmail