मुखपृष्ठ Top News जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

जळगावात तरुणावर धारदार शस्त्राने वार

by sitemanager

जळगाव :- पैसे न दिल्याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करीत सूर्यभान हिंमत पाटील (वय ३९, रा. कुसुंबा) यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना दि. १९ एप्रिल दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुसुंबा गावातील हॉटेल सरकार समोर घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील सुर्यभान हिमंत पाटील यांची पाईप कंपनी आहे. दि. १९ एप्रिल रोजी दुपारी ते पाईपाचे बाकी असलेले पाच लाख रुपये घेण्यासाठी संशयित विकास पाटील यांच्या मालकीचा असलेल्या पाणी फिल्टर प्लॅन्टवर गेले होते. त्यांनी बाकी असलेले पैसे मागितले असता, विकास पाटील यांच्यासह त्यांचे साथीदार मंगेश निळे, आकाश, चेतन यांनी सुर्यभान यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यातील एकाने धारदार शस्त्राने पाटील यांच्यावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी सुर्यभान पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल सोनार हे करीत आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या