मुखपृष्ठ Top News जळगावातून तरुणाची दुचाकी लांबविली

जळगावातून तरुणाची दुचाकी लांबविली

by sitemanager

जळगाव : शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोरून तरुणाची दुचाकी चोरट्याने लांबवल्याची घटना दि. ११ एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील योगेश्वर नगरात ललित वसंत चौधरी (वय ३९) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दि. ११ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता ते त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १८ एल ५५१४) ने कामाच्च्या निमित्ताने शहरातील गांधी उद्यानाच्या गेटसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी ही चोरून नेल्याचे समोर आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवार दि. १५ एप्रिल रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या