मुखपृष्ठ Top News विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक मेजवानी

विवेकानंद प्रतिष्ठान तर्फे सांस्कृतिक मेजवानी

by sitemanager

जळगाव – छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम आणि विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघनगर, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, श्रवण विकास मंदिर, डॉ अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभाग यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारीत नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लोकमतचे सहसंपादक विलास बारी, असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर सोनाली पांडुरंग पाटील, नेत्रज्योती हॉस्पिटलच्या एडमिनिस्ट्रेटर शितल खर्चे, तरुणभारतचे उपसंपादक रविंद्र मोराणकर, शाळेचे पालक डॉ. अमित जयस्वाल, नीतू सूर्यवंशी, राजेश यावलकर, प्रतीक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, संस्थेचे सचिव रत्नाकर गोरे, कोषाध्यक्षा हेमलता अमळकर, पाध्ये मॅडम, कविता दीक्षित, सहसचिव विनोद पाटील तसेच विवेकानंद प्रतिष्ठानचे संचालक मंडळ, प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, प्राचार्य ज्ञानेश्वर वाघ, प्राचार्य प्रवीण सोनवणे, मुख्याध्यापक हेमराज पाटील, मुख्याध्यापिका योगिता शिंपी, मुख्याध्यापिका कल्पना बाविस्कर, सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळेंसह सर्व विभाग प्रमुख व समनवयक उपस्थित होते.
डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन “दृष्टीचे सृष्टी सौंदर्य” या संकल्पनेवर आधारित सादर करण्यात आले. यात चिमुकल्यांनी बाप्पाशी संवाद साधत आकाशाची सैर केली. आकाशातला चांदोबा, तारे, चांदण्या, पाऊस, वारा, चिऊताई यांच्याशी गुजगोष्टी केल्या आणि त्यांच्यासोबत येणारी मज्जा, उडणारी तारांबळ व मिळणारा आनंद आपल्या गाण्यातून व्यक्त केला, म्हणजेच काय तर ‘करूनी बाप्पाला नमन, करूया आकाश भ्रमण’ याची प्रचिती आली. प्राथमिक विभागातील इ. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी रंगतरंग या सांस्कृतिक सोहळ्यात विविध नृत्य सादर करून छत्रपती शिवरायांची महती सांगितली. या वर्षाचे रंगतरंगाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महारांजाचा राजयभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित हा नृत्य अविष्कार होता. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिवबा आमचा मल्हारी, दौडत दौडत बाल शिवाजी, आम्ही गड्या डोंगरचे राहणार, हे राजे जी,जी, राज आलं, युगत मांडली, आरंभ है प्रचंड, शंकरा रे शंकरा या गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी नृत्यातून धाडसी, संघटन, योद्धा, पराक्रमी, गुणवंत इ शिवाजी महाराजांच्या गुणांचा गौरव केला.
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयातील नर्सरी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील (इयत्ता पहिली, दुसरी) दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीभूत कलाविष्काराने नुकतेच उपस्थित पालक वर्ग व रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी ‘ओ राजे जी..रे जी ..जी..’, ‘आम्ही शिवबाचे चाकर’ व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी ‘मल्हारी मल्हारी मल्हारी शिवबा आमचा मल्हारी’ या गीतांवर उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर नृत्य सादर करून महाराष्ट्राची लोकसंस्कृती दाखवली. यामध्ये महाराष्ट्राच्या लोकधारेवर आधारित लावणी, भारुड, डोंबारी, धनगर नृत्य, आदिवासी नृत्य, घोंगड, जोगवा, वासुदेव, गोंधळ, भक्ती गीत, शेतकरी नृत्य इत्यादी प्रकारचे नृत्य सादर केले
तसेच इंग्लिश मीडियम व विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक विभागातील नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचा विविध सण हा विषय घेऊन नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सजावटीची सर्व कलाशिक्षक यांनी निर्मिती केली. तसेच गीत गायन व वादन संगीत शिक्षक व विद्यार्थी यांनी सादर केले. सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, समन्वयक यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन रंगतरंग प्रमुख योगिता शिंपी यांनी केले तसेच विवेकानंद प्रतिष्ठान सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख किरण सोहळे यांनी सहकार्य केले.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या