मुखपृष्ठ Top News रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूल २०२३-२४ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार

रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूल २०२३-२४ हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार

by sitemanager

जळगाव – न्यू एरा एज्युकेशन सोसायटी जळगाव संचलित रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूल आणि रोझलॅण्ड प्राथमिक वि‌द्यामंदिर जळगाव या दोन्ही शाळांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण ­विकासावर भर दिला जातो. उत्तम संस्कार आणि सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी ही संस्था गेल्या ५० वर्षापासून सतत कार्यरत आहे. स्वर्गीय डी. एस. खिमाणी मॅडम यांनी १९७४ साली जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून या शाळेची स्थापना केली. सर्व समाजातील मुलांना अत्यंत माफक दरात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे ह्या प्रामाणिक हेतूने ही शाळा सुरु केली आहे. महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डाचा अभ्यासक्रम शाळेने जरी स्वीकारला असला तरी त्याला अमेरिकन प्री. आय बी करिक्युलम या जागतिक स्वरुपाच्या अभ्यासक्रमाची जोड दिलेली आहे, जेणेकरून आपला विद्यार्थी देश-विदेशातील अभ्यासक्रमाच्या तोडीला तोड देऊन शिक्षण घेऊ शकेल. यासाठी यु एस ए ची टीम या संस्थेत स्वयंसेवक (वॉलेंटियर) म्हणून विद्यार्थ्यांना येत असते. इंग्रजी, कम्प्युटर, स्पोर्ट, सायन्स विषयाचे सखोल ज्ञान मुलांना देण्याकडे शाळेचा भर आहे.

 

रोझलॅण्ड इंग्लिश मिडियम स्कूलचे २०२३ – २४ हे ५० वे वर्षे साजरे करत आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षात विविध कलागुणांवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थी हिताचे विविध उपक्रमांसाठी ही शाळा अग्रेसर आहे. यावर्षी रानकविता महोत्सव घेऊन खानदेशरत्न स्व. ना. धो. महानोर यांना आदरांजली वाहीली जाणार आहे. या कार्यक्रमातून मुलांमध्ये कविता लेखन आणि सादरीकरणाचं बीज रोवण्यांचा प्रयत्न करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

स्व. डी. एस. खिमानी मॅडम यांनी लावलेल्या रोपट्याला त्यांच्या अमेरिकास्थित कन्या रोजमीन खिमाणी प्रधान व नात सानिया प्रधान संस्थेची धुरा सांभाळत आहेत. अधिकाधिक उत्कृष्ट आणि टेक्नॉलॉजीने भरपूर अशा शैक्षणिक वर्षाकडे शाळेची वाटचाल सुरू आहे. रोजमिन खिमाणी प्रधान यांनी सांगितले.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या