मुखपृष्ठ थेट-भेट नटखट आजतरी गोड बोला

नटखट आजतरी गोड बोला

by sitemanager

नटखट

आजतरी गोड बोला

 

अरे याच्या त्याच्या विरोधात,

दिवसभर बोलता तुम्ही कडू.!

शेवटी त्यांनाच घेता सोबत,

मग म्हणता तोच आपला भिडू.!

 

राजकारणी तर बोलतांना,

ठेवतात गहाण आपली अक्कल.!

संधी येता कोलांटउडी मारायची,

लढवता गोड बोलायची शक्कल.!

 

अरे राजकारण घाला चुलीत,

आतातरी मनातले ते दारं खोला.!

कोरोनाचे ते क्षण आठवून,

किमान आतातरी गोड बोला.!

– धन्यकुमार जैन

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या