मुखपृष्ठ Top News विद्युत तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

विद्युत तारांना स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

by sitemanager

जळगाव :  शेतातील झाडांच्या तोडतांना गेलेल्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का लागून किशोर पंढरीनाथ कोळी (वय ३६, रा. साकेगाव, ता. भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दि. १६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास साकेगाव ते भानखेडा रस्त्यावरील शेतात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे किशोर कोळी हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शेतातील मूजरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी किशोर हा साकेगाव ते भानखेडा रस्त्यावरील शेतातील बांधावर

झाडाच्या फांद्या तोडत होता. त्यावेळी झाडाजवळून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याचे विजेचा जोरदार धक्का बसला, आणि तो झाडावरून खाली कोसळला. विजेचा जोरदार शॉक लागल्याने किशोर कोळी याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्याठिकाणावरील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच त्याला शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करीत किशोर कोळी यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई जनाबाई, पत्नी कल्पनाबाई आणि विवाहित दोन बहिणी असा परिवार आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या