मुखपृष्ठ Top News एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

by sitemanager

जळगाव : एक लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसीतील रेमंड चौक येथील माहेर असलेल्या रूपाली प्रसन्नकुमार गव्हाळे यांचा विवाह पुण्यातील सुयोग कॉलनी येथील प्रसन्नकुमार पंढरीनाथ गव्हाळे यांच्याशी झाला आहे. आजारपणासाठी विवाहितेला माहेराहून १ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहिते माहेराहून पैसे आणले नाही. या रागातून पती प्रसन्न कुमार याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली तर सासू, सासरे, दिर आणि दिराणी यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला.

हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती प्रसन्नकुमार पंढरीनाथ गव्हाळे, सासू कलावती पंढरीनाथ गव्हाळे, सासरे पंढरीनाथ गव्हाळे, दीर सुशांत पंढरीनाथ गव्हाळे, दिराणी सपना सुशांत गव्हाळे, नणंद प्रज्ञा दिनेश वानखेडे सर्व रा. पुणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत
आहे.

 

 

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या