मुखपृष्ठ Top News मोबाईल लांबविणारा अटकेत ; एलसीबीची कारवाई

मोबाईल लांबविणारा अटकेत ; एलसीबीची कारवाई

by sitemanager

जळगाव;- नाश्त्यासाठी थांबलेल्या तरुणाचा मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्याला धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी 17 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता अटक केली आहे. रुपेश प्रभाकर माळी वय-19 रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

संदीप भगवान साळुंखे वय-३५, रा. बिलखेडा ता. जळगाव हा तरुण जळगाव तालुक्यातील कानळदा येथील बसस्थानक जवळ नाश्त्यासाठी शनिवारी १३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता थांबला होता. त्यावेळी संशयित आरोपी रुपेश प्रभाकर माळी याने संदीप साळुंखे या तरूणाचा मोबाईल चोरून नेला. याबाबत रविवारी १४ एप्रिल रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे हे करत होते. दरम्यान संशयित आरोपी हा धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी रुपेश माळी याला बांभोरी गावातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवी नरवाडे, जितेंद्र पाटील, राजेश मेढे, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, भारत पाटील यांनी केली आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या