मुखपृष्ठ Top News आव्हाने शिवारात मजुराचा निर्घृण खून

आव्हाने शिवारात मजुराचा निर्घृण खून

by sitemanager

जळगाव : जिनिंगमध्ये काम करणाऱ्या सुरेश परमसिंग सोलंकी (वय २५, रा. खेमला, जि. सेंधवा, मध्यप्रदेश, ह. मु. आव्हाणे शिवार) या कामगाराच्या डोक्यात कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करीत त्याचा निर्धन खून केला. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगच्या मागील शेतात घडली.

सुरेश सोलंकी (वय ४५, रा. दुहीशेतला ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. तो लक्ष्मी जिनिंगच्या परिसरामध्ये ठेकेदाराकडे मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या लक्ष्मी जिनिंगच्या मागील बाजूस प्लास्टिकच्या पिवळ्या फटवर डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्घूण खून करून मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले.

यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित आदींनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, हा खून नेमका कोणत्या कारणासाठी व कोणी केला याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक कामाला लागले असून रात्री उशिरापर्यंत हा गुन्हा उघडकीस येईल, अशी माहिती एलसीबी चे निरीक्षक किसन नजन पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, असोदा शिवारात मृतदेह आढळल्यानंतर आता आव्हाणे रस्त्यावर पुन्हा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या