मुखपृष्ठ Top News २० रोजी २० उमेदवारांनी घेतले ५४ अर्ज

२० रोजी २० उमेदवारांनी घेतले ५४ अर्ज

by sitemanager

जळगांवः – लोकसभा निवडणूक २०२४ ची अर्ज दाखल करण्याची सूचना १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दि.२० एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी १३ उमेदवारांनी ३५ अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १९ अर्ज घेतले. तर तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी संजय माळी या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. आज भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी देखील अर्ज घेतला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी मनोज गौरीशंकर शर्मा, जळगाव (अपक्ष) ४, ललित गौरीशंकर शर्मा यांनी श्रीमती तेजस्विनी ललित शर्मा जळगाव (अपक्ष) यांच्यासाठी ४, पंकज दत्तात्रय पवार, कन्नड यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर ता. अमळनेर (भाजपा) यांच्यासाठी ४, अनिल विश्वासराव मोरे, जळगाव यांनी सतीश विश्वासराव मोरे जळगाव (अपक्ष) यांच्यासाठी ४, दिगंबर अशोक सोनवणे जळगाव (अपक्ष) १, किरण उत्तमराव वारुळे अमळनेर यांनी श्रीमती स्मिता उदय वाघ डांगर ता. अमळनेर (भाजपा) यांच्यासाठी ४, नुरेजमील इसाभाई पटेल, जळगाव (अपक्ष) १, राजेंद्र सुभाष खरे, पळासखेडे ता. जामनेर ( बहुजन मुक्ती पार्टी) ४, जितेंद्र भागवत

स्मिता वाघ यांनी घेतला अर्ज: जळगांवसाठी १ अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल
केदार जळगाव (अपक्ष) १, दिलीप वसंत मराठे, जळगाव (अपक्ष) १, सचिन विष्णू घोडेस्वार, जळगाव (अपक्ष) २, धरमपाल हरिभाऊ इंगळे, मलकापूर (बहुजन समाज पार्टी) २, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा यांनी अनिल गंभीर मोरे, बोदवड (अपक्ष) यांच्यासाठी २ असे एकूण तेरा उमेदवारांनी ३५अर्ज घेतले आहेत.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी १९ अर्ज घेतले आहेत. त्यात रामेश्वर मनोहर लोहार, बोदवड ( हिंदुस्तान जनता पार्टी) ४, भिवराज रामदास रायसिंगे, चोपडा (अपक्ष) २, वसंत शंकर कोलते, जामनेर (अपक्ष) ४, कुंदन टोपलू तायडे, यावल (अपक्ष) २, शेख आबीद शेख बशीर, मलकापूर (अपक्ष) २, एकनाथ नागो साळुंके उर्फ अण्णासाहेब साळुंके, जामनेर (अपक्ष) २, विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (बहुजन समाज पार्टी) ३ असे एकूण ७
उमेदवारांनी १९ अर्ज घेतले आहेत

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या