मुखपृष्ठ Top News मविआचे उमेदवार करण पाटील यांनी घेतले एकविरा मातेचे दर्शन

मविआचे उमेदवार करण पाटील यांनी घेतले एकविरा मातेचे दर्शन

by sitemanager

जळगाव (प्रतिनिधी) : ;– तालुक्यातील आमोदा बु.च्या ग्रामदैवत आदिशक्ती एकविरा मातेचा यात्रोत्सवाला सुरूवात झाली असून सोमवारी दि. २२ रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील, माजी खा. उन्मेष पाटील यांनी यात्रोत्सवात सहभागी होवून आई एकविरा मातेचे दर्शन घेतले व विजयासाठी साकडे घातले.

पहाटे ४ वाजता गावातून काढण्यात आलेल्या मातेच्या पालखी मिरवणुकीत देखील करण पाटील, उन्मेष पाटील यांनी सहभागी होत ठेका धरला. पालखी आदिशक्ती एकविरा मातेच्या मंदिरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी करण पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका उपसंघटक शरद पाटील, सरपंच विजय सुर्यवंशी, उपसरपंच सुनंदा सुर्यवंशी, माजी सरपंच विकास सुर्यवंशी, बंडू सुर्यवंशी, छगन सुर्यवंशी, मनोहर पाटील (जामोद), मंदिराचे पुजारी गोपाल जोशी, धनंजय जोशी, मोहन जोशी, सेवेकरी रमेश सुर्यवंशी, जामोद सरपंच सतीलाला पाटील, कांतीलाल सुर्यवंशी, विजय सुर्यवंशी, महेंद्र सोनवणे, उमेश सोनवणे, बाळू आहिरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या