मुखपृष्ठ Top News श्री ओम साई मित्र मंडळाच्या जळगाव ते शिर्डी पायी पालखी सोहळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ

श्री ओम साई मित्र मंडळाच्या जळगाव ते शिर्डी पायी पालखी सोहळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ

by sitemanager

जळगाव – येथील श्री ओम साई मित्र मंडळ आयोजीत खान्देशातील पहिल्या श्री साईबाबांची जळगाव ते शिर्डी पायी पालखी सोहळयास आज दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा बळीराम पेठेतील साईबाबा मंदिरापासुन सुरुवात झाली. साईबाबा मंदिरातील मुर्तीला अभिषेक व आरती करण्यात आली त्यानंतर आयोजीत कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन ब-हाणपुर (मध्यप्रदेश) येथील माजी मंत्री अर्चना चिटणीस, सरकारी वकील सुरेंद्र काबरा, माजी महापौर सिमाताई भोळे, माजी नगरसेविका शोभाताई बारी, पाळधी येथील साईबाबा मंदिराचे सचिव सुनिल झंवर, मनिषभाऊ झंवर, अनिलभाऊ बाफना, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगोले, साईबाबा मंदिराचे ज्ञानेश्वर बारसे, रमेश दलाल, ज्ञानेश्वर जोग मंडळाचे अध्यक्ष रवि हसवाल आदि मान्यवर उपस्थित होते. जळगाव शिर्डी पालखी सोहळयासाठी अनेक वर्षापासून ब-हाणपुर येथिल साई भाविक सहभागी असतात.
गेल्या १८ वर्षापासून अविरत सुरु असलेली श्री ओम साई मित्र मंडळ आयोजीत खान्देशातील प्रथम श्री साईबाबांची जळगाव शिर्डी पायी पालखी सोहळयासाठी पिंप्राळा येथील साईभक्तांनी नवीन रथ तयार केला असून त्या सर्व साईभक्तांचे आ. चिटणीस यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. पालखीची सजावट करणारे किनगाव येथील साईभक्त यांचा सपत्नीक सत्कारही आ. अर्चना चिटणीस यांचे हस्ते करण्यात आला. सुत्रसंचालन अपूर्वा वाणी तर आभार विजय झंवर यांनी केले. ही पालखी शिर्डी येथे दि. ४ जानेवारी रोजी पोहचणार आहे. पालखी सोहळ्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रवि हसवाल, सचिव विजय झंवर, कोषाध्यक्ष किशोर देशमुख, सदस्य राजु पाटील, जगदीश गुरव, तुषार सोनार, महेंद्र बारी, सचिन पाटील, बंटी बारी, सचिन जंगले, किशोर पाटील, विलास पाटील, रणजित धनगर, विकास मराठे, सागर मनीयार आदी साईसेवक परिश्रम घेत आहेत.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या