मुखपृष्ठ Top News न्यायालयात निघाली भरती; चौथी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

न्यायालयात निघाली भरती; चौथी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

by PNI Digital

मुंबई: बॉम्बे उच्च न्यायालयामार्फत औरंगाबाद खंडपीठात भरतीसाठी जाहिरात संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये स्वयंपाकी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी चौथी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवार यासाठी ऑफलाईन पद्धतीनं 02 मे 2023 पर्यंत अर्ज सादर करु शकतात.

एकूण जागा : 03

पदाचे नाव : स्वयंपाकी (Cook)

शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा. सोबत स्वयंपाक करण्याचा अनुभव आवश्यक

पगार किती मिळणार?

स्वयंपाकी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास – 16,600/ते 52,400/- रुपये प्रतिमहिना इतके वेतन मिळेल.

अर्ज कसा करावा?

– स्वयंपाकी पदासाठी भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
– अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
– उमेदवारांनी अर्ज वरिल दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
– सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.
– स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद 431009.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 02 मे 2023

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या