मुखपृष्ठ Top News प्रसिद्ध उद्योगपती, जैन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा. अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त जवान भारत ने तयार केलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन करतांना मा. अशोकभाऊ जैन, सोबत संपादक धन्यकुमार जैन, अनिल जोशी, व्यवस्थापक किशोर वेळेकर, जाहिरात व्यवस्थापक पंकज पवार….

प्रसिद्ध उद्योगपती, जैन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा. अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त जवान भारत ने तयार केलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन करतांना मा. अशोकभाऊ जैन, सोबत संपादक धन्यकुमार जैन, अनिल जोशी, व्यवस्थापक किशोर वेळेकर, जाहिरात व्यवस्थापक पंकज पवार….

by sitemanager

शुद्ध बीजापोटी.! फळे रसाळ गोमटी.!!

 

संत तुकारामांचे अभंग म्हणजे जीवनाचा सार आणि उत्तम अशा उपदेशात्मक सुभाषितांचा खजिनाच आहे.

 

शुद्ध बीजापोटी.! फळे रसाळ गोमटी.!!

मुखी अमृताची वाणी.! देह देवाचे कारणी.!!

सर्वांग निर्मळ.! चित्त जैसे गंगाजळ.!!

तुका म्हने जाती.! ताप विश्रांती दर्शने.!!

संत तुकारामांच्या अभंगातील या ओळी आपल्याला, प्रत्येकाला बालपणापासूनच कानावर पडत आल्या आहेत. या अभंगातून तुकारामांनी बिज आणि संस्काराचे महत्व सांगीतले आहे.

तुकाराम महाराज म्हणतात बीज म्हणजे बियाणं जर शुद्ध, कसदार, आणि संस्कारी असेल तर त्या झाडाला फळेही चांगली गोड आणि रसाळ येतात. जर बीज किडके असेल तर त्या बिजापासून बनलेले झाड आणि त्याला येणारी फळे ही देखील कमकुवत निपजतात. या बिजाप्रमाणेच माणुसही संस्कारी, निर्व्यसनी, पुण्यवान, शिलवान, चारिञ्यवान शुद्ध असेल तर त्याच्या पोटी जन्माला येणारी संततीही गोमटी, शिलवान, चारिञ्यवान, संस्कारी निपजते. त्यामुळे माणसाच्या मुखात नेहमी अमृताची वाणी असावी. माणसाने नेहमी गोड बोलावे. ईश्वर भक्तीत लिन व्हावे. माणसाचे मन आणि शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ आणि शुद्ध ठेवावे.

पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येकासाठी संत तुकारामांच्या अभंगातील ऊपदेशाची गरज आहे. सर्व मानव जात संस्कारहीन, शुद्ध बीज हिन होत चालली आहे. त्यामुळे येणारी पिढीही संस्कारहीन होत जाईल की काय, अशी भिती वाटते. संत तुकारामांचा ह्या ऊपदेशाचा अंगीकार करणारे कुणी उरेल की नाही, असेही वाटते, पण अजूनही संस्काराच्या बीजाच्या पेरणीतून संस्काराचे झाड निपजलेलं आपल्याला दिसते, आणि याची जाणीव पदोपदी येते. काही व्यक्ति समाजाप्रती असलेलं प्रेम, अडलेल्या, रंजलेल्या, गांजलेल्या लोकांना मदत करण्यापासून तर समाजातील विविध घटकाला उन्नतीच्या, विकासाच्या आणि ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपला उद्योग, व्यवसाय सांभाळून करत आहेत. त्यातील एक नाव म्हणजे जैन उद्योग समूहाचे प्रमूख तथा चेअरमन अशोकभाऊ जैन. अशोकभाऊ यांचा आज वाढदिवस….

भाऊंसारख्या व्यक्तीने निरोगी, दिर्घायुष्य जगावे, अशा सदिच्छा, शुभेच्छा, प्रेम सर्व स्तरातून व्यक्त होते. त्यांच्या दिर्घायुष्याठी प्रार्थनाही करणारे देखील आहेत. कारण हजारो कुटूंबाचा पोशिंदा जगला तर अनेकांचं जीवन सुसह्य होतं. आणि आज अशोकभाऊ शेती क्षेत्रापासून तर देश- विदेशात पसरलेल्या जैन उद्योगाशी जोडलेल्या प्रत्येकाशी निगडीत लाखो लोकांसाठी ते दिवस- रात्रं काम करतात. एवढा मोठा उद्योग समूह सांभाळून आपल्या मातीतल्या लोकांसाठी काम करायला ते सदैव तयार असतात.

जळगाव आणि राज्यभरात वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष त्यांचा सहभाग असतो. अनेक उद्योजक, व्यापारी हे उद्योग व्यवसायात नाव, पैसा कमवल्यानंतर सामाजिक कामात व्यग्र होतात. त्यानंतर राजकारण. मग पूर्ण वेळ राजकारण आणि मिळालाच वेळ तर समाजकारण. पण अशोकभाऊ कधीच राजकारणाच्या मोहात पडले नाही. उद्योग आणि समाजकारण हेच त्यांचं कामाचं पुर्णवेळ कार्यक्षेत्र राहिलं आहे. अर्थात, हे सर्व त्यांच्यात कृषिक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त आदरणीय पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संस्काराच्या वारसातून आले आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. सुरूवातीच्या कारकीर्दीत त्यांनी आयात-निर्यात आणि सामान्य प्रशासन विषयांचे प्रशिक्षण घेतले. नंतरच्या काळात, त्यांनी कच्चा माल खरेदी, उत्पादन, विक्री आणि विपणन, मानव संसाधन विकास, सामान्य प्रशासन ह्या कंपनीच्या विविध विभागांमध्ये अनुभव घेतला. तसेच गेल्या चार दशकांपासून ते शाश्वत शेतीसाठी परिश्रम घेत आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा लाभलेले अशोकभाऊ सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, आरोग्य आणि क्रीडा विषयाशी संबंधित संस्थेचे कृतिशील पदाधिकारी आहेत. या प्रत्येक क्षेत्रात ते सक्रिय असतात. त्यात वेगळं काम आणि उपक्रम राबवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यामुळे आज भूमिपुत्रांशी, समाजातील अनेक घटकांशी जैन उद्योग समूह आणि जैन परिवाराचे घट्ट ऋणानुबंध जुळले आहेत. कंपनीच्यावतीने अनेक समाज विधायक कामात सकारात्मकपणे सुसंवादी असा त्यांचा पुढाकार राहिलेला आहे. अर्थात, हे सर्व शुद्ध, कसदार, संस्कारी, विचारवंत आदरणीय भवरलालजी जैन यांनी केलेल्या बीजारोपणाचेच ते फळ म्हणावे लागेल. अशा या शिलवान, चारिञ्यवान, संस्कारी, निर्मळ, साध्या, सरळ व्यक्तीमत्त्वाला दिर्घायुष्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा..!!

 

– धन्यकुमार जैन

संपादक

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या