मुखपृष्ठ Top News कोटक म्युच्युअल फंडचा जळगावमध्ये “सीखो पैसो की भाषा” उपक्रम

कोटक म्युच्युअल फंडचा जळगावमध्ये “सीखो पैसो की भाषा” उपक्रम

by sitemanager

जळगाव – कोटक म्युच्युअल फंडने जळगावमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) सोबत भागीदारी करून गुंतवणूकदारांचे शिक्षण आणि जागरूकता उपक्रम ‘सीखो पैसो की भाषा’ हा उपक्रम आयोजित केला आहे. आर्थिक साक्षरतेचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने व त्यांची आर्थिक समज वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील 7575 हून अधिक आणि जळगावमधील 375 सीबीएसई शिक्षकांना आर्थिक साक्षरतेबद्दल शिक्षित करणे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे. यामध्ये ५० टक्के महिला अपेक्षित आहेत.

उपक्रमाचा एक भाग म्हणून, कोटक म्युच्युअल फंडने सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग (CIEL) मधील ५०० पेक्षा जास्त कुशल प्रशिक्षकांना बोर्डात आणले आहे. जे प्रभावी सत्रांचे नेतृत्व करतात.

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट एच सेक स्कूल (जळगाव), मुख्याध्यापिका मर्टल रेजीना बी म्हणाल्या, “शोध पैसो की भाषा” या कार्यक्रमातील सहभाग, आम्हाला आमच्या शिक्षकांना माहितीपूर्ण आर्थिक निवडी करण्यासाठी आणि त्यांच्या उद्दिष्टांचा आत्मविश्वासाने पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक ज्ञान प्रदान करण्यास सक्षम करते.

डिजिटल बिझनेस, मार्केटिंग अँड एनालिटिक्सचे प्रमुख किंजल शहा म्हणाले की, या गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम ‘सीखो पैसो की भाषा’ द्वारे आम्ही आर्थिक सक्षमीकरण जोपासण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमचा विश्वास आहे की आपल्या देशाचे नशीब घडवण्यात आणि नवीन पिढी घडवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. सीबीएसई सोबतची आमची भागीदारी ही आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीबद्दल आदरणीय शिक्षकांना शिक्षित करणे आणि जागरुकता निर्माण करणे आहे. एकत्रितपणे, आम्ही असे भविष्य घडवू शकतो जिथे आर्थिकदृष्ट्या जागरूक शिक्षक अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत करू शकतात.

हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या सशक्त भारताच्या प्राप्तीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्याचा उद्देश प्रगती आणि वाढीसाठी राष्ट्राच्या आकांक्षेशी उत्तम प्रकारे संरेखित करणे आहे. ‘सीखो पैसो की भाषा’ द्वारे देशाच्या आर्थिक जडणघडणीला आकार देण्यास मदत होईल.

CBSE काय आहे.?

द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन हे सार्वजनिक आणि खाजगी शाळांसाठी असलेले देशातील आघाडीचे नॅशनल एज्युकेशन बोर्ड आहे. CBSE ही भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करणारी एक स्वायत्त संस्था असून तिला संपूर्ण जगात मान्यता आहे. CBSEची प्रमुख उद्दिष्टे

सर्व मुलांना तणावमुक्त, बालकेंद्रित आणि सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांचा योग्य दृष्टिकोन ठेवत असतांनाच कोणत्याही प्रकारे गुणवत्तेशी तडजोड न करणे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांकडून अभिप्राय जमा करून शैक्षणिक उपक्रमांच्या गुणवत्तेचे विश्लेषण आणि परीक्षण करणे. गुणवत्ता समस्यांसह विविध शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मानदंड विकसित करणे; मंडळाच्या विविध शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण आणि समन्वय साधणे; शैक्षणिक उपक्रम आयोजित करून प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतर संस्थांचे पर्यवेक्षण करणे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या