मुखपृष्ठ Top News अयोध्या येथील श्रीराम मंदिरास डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे शबरी मातेची चांदीची प्रतिमा समर्पित

अयोध्या येथील श्रीराम मंदिरास डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे शबरी मातेची चांदीची प्रतिमा समर्पित

by sitemanager

जनम भर करी साधना, शबरी राम दरसन पाय

जळगाव – जनम भर करी साधना, शबरी दरसन पाय, राम मिलन की कामना सहज सफल हो जाय हे भजन प्रभु श्रीरामचंद्र आणि शबरी माता भेटीचे चित्र डोळ्यासमोर आणते. आयुष्यभर प्रभु रामाच्या भेटीसाठी साधना करणाऱ्या शबरी मातेला रामचंद्रांनी दिलेल्या दर्शनानंतर आयुष्याचे सार्थक झाले. अशाच प्रसंगाचे स्मरण करणारी सव्वा किलो चांदीची प्रतिमा गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्यातर्फे महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येतील श्रीराम मंदिरास समर्पित करण्यात आली.

अयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी प्रभु श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हा सोहळा संपूर्ण देशवासियांसाठी एक आस्थेचे प्रतिक आहे. तसेच या सोहळ्याच्या आयोजनात देशातील प्रत्येक रामभक्त आपापल्या परिने योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. असाच छोटासा प्रयत्न म्हणून गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ही प्रतिमा महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्याहस्ते श्रीराम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपतराय यांच्याकडे नुकतीच सुपुर्त करण्यात आली. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, उज्जैन येथील महामंडलेश्वर राधेराधे (मदनमोहन दास) महाराज उपस्थित होते.

प्रतिमेतून भगवंत अन् भक्त भेटीचा प्रसंग प्रकट

जळगावच्या लुंकड ज्वेलर्स यांच्याकडून ही चांदीची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. सव्वा किलो वजन असलेल्या या प्रतिमेत प्रभु श्रीरामचंद्र हे वनवासात असतांना वनविहार करतांना प्रभु रामचंद्र आणि दर्शनासाठी प्रतिक्षा करणाऱ्या शबरी मातेची झालेली भेट, या भेटीत प्रभु श्रीरामचंद्र यांनी खाल्लेली शबरी मातेची उष्टी बोरे हा भगवंत आणि भक्त यांच्या अतुट नात्यातील अविस्मरणीय प्रसंग दर्शविण्यात आला आहे. गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या या समर्पण भावनेचे कौतुक होत आहे.

 

प्रभू श्रीराम हे सर्वांचेच दैवत आहे. श्रीरामाने शबरीने दिलेली बोरं खाल्ली. यातून भगवंत आणि भक्त यांच्या नात्याचा गोडवा दिसून येतो. याच भावनेतून ही संकल्पना उदयास आली.

– डॉ. केतकी पाटील, संचालिका गोदावरी फाउंडेशन

भक्त आणि भगवंत यांचे अतूट नाते असते. भगवान श्रीराम व माता शबरी यांच्या चरित्रातून श्रीराम समरसतेचे प्रतीक आहेत.

– महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या