मुखपृष्ठ Top News माणवासिय भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले देवकर कुटुंब

माणवासिय भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले देवकर कुटुंब

by sitemanager

महेश झेंडे – प्रतिनिधी

पुणे – बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या माणवासीय भूषण पुरस्काराचे मानकरी देवकर कुटुंब ठरले आहे. श्री छत्रपती स्वाभिमानी सेवकांची सह. पतसंस्था मर्या. भवानीनगरचे मा. चेअरमन अशोक बंडू देवकर (सर), सौ सुजाता अशोक देवकर व त्यांच्या सर्व कुटुंबीयांस मानवासिय रहिवासी प्रतिष्ठान बारामती व माण तालुक्याच्या वतीने देण्यात येणारा माणवासीय भूषण पुरस्कार शनिवार दि.०६ जानेवारी रोजी बारामती येथे प्रसिद्ध उद्योगपती, औद्योगिक वसाहत बारामतीचे चेअरमन रणजीत (आण्णा) पवार, माण – खटावचे आ. जयकुमार गोरे तसेच पुण्याचे माजी जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे हस्ते देवकर कुटुंबीयांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी असंख्य मानवासिय नागरिक आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते. माण तालुक्यातील चारशेपेक्षा जास्त कुटूंब बारामती तालुक्यात व परिसरात राहत असून सर्वांनी एकत्र येऊन माणवासीय रहिवाशी प्रतिष्ठान (बारामती) स्थापन केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुटुंबाला प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते.

असे आहे देवकर कुटुंब

कै. बंडू कृष्णा देवकर आणि कै. यशोदाबाई बंडू देवकर हे मूळचे मान तालुक्यातील मोही गावचे रहिवासी, त्यांना (बाळासाहेब बंडू देवकर – हे मयत आहेत), मधुकर बंडू देवकर, सुखदेव बंडू देवकर आणि अशोक बंडू देवकर ही तीन मुलं व तीन मुली आहेत.

कै. बंडू कृष्णा देवकर हे रोजी रोटीसाठी १९६५ – ६६ साली बारामती जवळील खताळपट्टा (ढेकळवाडी) यागावी म्हणजेच सासरवाडीला स्थायिक झाले. तेथेच त्यांनी आपला छोटासा संसार थाटला. तसे देवकर दांपत्य अतिशय कष्टाळू होते यांनी सुरुवातीला शेतामध्ये काम केले. देवकर भावंडांचे मामा बलवंड कुटुंबीयांचा या कुटुंबाला खूप मोठा आधार मिळाला. त्यांच्याच मदतीमुळे हे कुटुंब या गावांमध्ये स्थायिक ही झाले होते. त्यांच्या झालेल्या प्रगतीतही बलवंड कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचप्रमाणे देवकर कुटुंबीय आणि बलवंड कुटुंबीयांचे पवार कुटुंबाबरोबर अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. निगर्वी, बडेजावपणा नसलेले सर्वांना आपलेसं करुन घेणारे हे कुटुंब आहे. अत्यंत मनमिळावू व सतशिल कुटुंबाला हा पुरस्कार म्हणजे आदर्श परीवाराचा गौरवच म्हणावा लागेल..!

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या