मुखपृष्ठ Top News भाजप नेते गिरीश महाजन झाले आजोबा ; सोशल मीडियावर फोटो टाकून केला आनंद व्यक्त

भाजप नेते गिरीश महाजन झाले आजोबा ; सोशल मीडियावर फोटो टाकून केला आनंद व्यक्त

by sitemanager

जळगाव ;- भाजप नेते व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आजोबा झाले असून त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतांना हि गॉड वार्ता समजल्याने ते तात्काळ हॉस्पिटलला दाखल होत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हि माहिती देत आनंद व्यक्त केला.

सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये ना. गिरीश महाजन यांनी म्हटले आहे की, कुटुंबातील आपणा सर्वांना आम्ही आजी – आजोबा झाल्याची गोड बातमी देतांना अत्यानंद होत आहे… कन्या श्रेया व जावई अक्षय यांच्या संसारवेलीवर प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने गोंडस मुलाच्या रूपात सुंदर फुल उमलले !  कुटुंबातील या चिमुकल्याच्या सोबतीने लहानपण पुन्हा जिवंत करण्यास आतुर आहोत.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या