मुखपृष्ठ ठळक बातम्या जळगाव लोकसभा मतदार संघात २० तर रावेरमध्ये २९ उमेदवार वैध

जळगाव लोकसभा मतदार संघात २० तर रावेरमध्ये २९ उमेदवार वैध

by sitemanager

जळगावः- जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया दि. २६ रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव लोकसभा मतदार संघात ४ उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता २० उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात २ उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता २९ उमेदवार निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.

सर्व नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे जळगाव लोकसभेचे सर्वसामान्य निरीक्षक डॉ. राहुल गुप्ता तर रावेर लोकसभेसाठीचे सर्वसामान्य निरीक्षक अशोक कुमार मीना हे उपस्थितीत होते. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सर्व अर्जाची जळगांव लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तर रावेर लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी छाननी केली.
जळगांव लोकसभा मतदार संघात वैध ठरलेले उमेदवारः करण बाळासाहेब पवार (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,) विलास शंकर तायडे (बहुजन
समाज पार्टी), स्मिता उदय वाघ, (भारतीय जनता पार्टी ) ईश्वर दयाराम मोरे (सैनिक समाज पार्टी), नामदेव पांडुरंग कोळी (अखिल भारत हिंदू महासभा), युवराज भीमराव जाधव (वंचित बहुजन आघाडी), अब्दुल शकूर देशपांडे (अपक्ष), अहमद खान युसुफ खान ( अपक्ष), करण संजय पवार (अपक्ष), पाटील संदीप युवराज (अपक्ष), प्रदीप शंकर आव्हाड (अपक्ष), डॉ. प्रमोद हेमराज पाटील, (अपक्ष), महेंद्र देवराम कोळी ( अपक्ष), मुकेश मूलचंद कोळी (अपक्ष), रोहित दिलीप निकम (अपक्ष), ललित गौरीशंकर शर्मा (अपक्ष), लक्ष्मण गंगाराम पाटील (अपक्ष), अडव्होकेट बाबुराव तुकाराम दाणेज (अपक्ष), संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी (पाटील) (अपक्ष), संजय एकनाथ माळी (अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

जळगांव लोकसभा मतदार संघात चार अवैध ठरलेले उमेदवार :- अंजली करण पाटील, मोहसिन खान, ज्ञानेश्वर मगनपुरी गोसावी, ईशान राठोड असे आहेत.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या