मुखपृष्ठ Top News शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची ६ लाखांमध्ये फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची ६ लाखांमध्ये फसवणूक

by sitemanager
Online Fraud File Photo

जळगाव ;- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जळगावात राहणाऱ्या एका व्यापार्याची ५ लाख ९५ हजारांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील जय नगरातील रहिवाशी हेमेंद्र राजेंद्र शर्मा वय ५६ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात . राम इनव्हेस्टमेंट नावाच्या व्हॉटसॲप गृपच्या माध्यमातून गृप ॲडमीन गुरूराम या नावाच्या व्यक्तीने हेमेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शर्मा यांचा विश्वास संपादन करून त्यांनी टेकस्टार कंपनीचे शेअर खरेदी करण्यास सांगितले. त्यासाठी गुरूराम नामक व्यक्तीने त्यांनी टेकस्टार हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला सांगितले. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२४ ते ४ एप्रिल २०२४ दरम्यान त्यांच्या खात्यातून एकुण ५ लाख ९५ हजार रूपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर त्यांना मुद्दल आणि नफा परत मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी २७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार गुरूराम नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या