मुखपृष्ठ Top News हौसेला मोल नाही! ‘या’ व्यक्तीने विकत घेतला 20 कोटींचा कुत्रा, विशेषतः जाणून तुम्ही व्हाल थक्क

हौसेला मोल नाही! ‘या’ व्यक्तीने विकत घेतला 20 कोटींचा कुत्रा, विशेषतः जाणून तुम्ही व्हाल थक्क

by PNI Digital

बंगळुरु : आजच्या काळात अनेकांना कुत्रे पाळण्याची आवड असते. असेही म्हणतात की माणूस विश्वासघात करतो पण पाळीव कुत्रा कधीही फसवत नाही. जगात कुत्र्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत. लोक ते विकतही घेतात, पण साधारणपणे कुत्र्यांची किंमत फार जास्त नसते, पण एका व्यक्तीने खास जातीचा कुत्रा विकत घेण्यासाठी तब्बल 20 कोटी रुपये खर्च केले आहेत, ही एक आश्चर्यकारक बाब आहे.

एका रिपोर्टनुसार, बंगळुरूमधील एका व्यक्तीने अलीकडेच हैदराबादमधून 20 कोटी रुपयांचा महागड्या जातीचा कुत्रा विकत घेतला आहे. या व्यक्तीला महागड्या जातीचे कुत्रे विकत घेण्याचा वेगळा छंद आहे. सतीश असे या व्यक्तीचे नाव असून ते इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत आणि बंगळुरूमध्ये कुत्र्याचे मालक आहेत.

कुत्र्याने 32 पदके जिंकली

बंगलोर मिररने वृत्त दिले की सतीशने या कॉकेशियन शेफर्ड कुत्र्याचे नाव “कॅडबॉम्स हैदर” ठेवले आहे. हैदर दीड वर्षांचा आहे. त्याने अलीकडेच त्रिवेंद्रम केनेल क्लबच्या कार्यक्रमात आणि आणखी एका डॉग शोमध्ये भाग घेतला. विशेष म्हणजे त्याने सर्वोत्तम श्वान जातीसाठी 32 पदके जिंकली आहेत.

अत्यंत दुर्मिळ आहे श्वान

कॉकेशियन शेफर्ड हा एक पशुधन संरक्षक श्वान आहे, जो कॉकेशस प्रदेशातील आहे, हा विशेषत: जॉर्जिया, आर्मेनिया, अझरबैजान, ओसेशिया, सर्केसिया, तुर्की, रशिया आणि दागेस्तान देशात पाहायला मिळतो. भारतात हा श्वान अत्यंत दुर्मिळ आहे.

चीनमधून आणले 2 कोटींचे पिल्ले

या कुत्र्याच्या मालकाने सांगितले की, हैदर आकाराने खूप मोठा आणि अतिशय मनमिळाऊ आहे. सध्या तो फक्त माझ्या घरीच राहतो. ही व्यक्ती केवळ महागडे आणि दुर्मिळ जातीचे कुत्रे खरेदी करण्यासाठी ओळखली जाते. 2016 मध्ये दोन कोरियन मास्टिफ जातीचे कुत्रे पाळणारे सतीश भारतातील पहिले व्यक्ती बनले. त्या प्रत्येकाची किंमत एक कोटी रुपये होती. त्यांनी हे कुत्रे चीनमधून आणले होते.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या