मुखपृष्ठ Top News हिरे व्यापाऱ्याच्या 8 वर्षीय मुलीनं घेतला संन्यास, जैन मुलं का करताय संसाराचा त्याग?

हिरे व्यापाऱ्याच्या 8 वर्षीय मुलीनं घेतला संन्यास, जैन मुलं का करताय संसाराचा त्याग?

by PNI Digital

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील हिरे व्यापाऱ्याच्या आठ वर्षीय मुलीने संन्यास घेतला आहे. देवांशी संघवी ही कोट्यवधी रुपयांची वारसदार असतानाही कुटुंबियांच्या संमतीने संन्यासी होण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो लोकांच्या उपस्थितीत आज बुधवारी (दि. 18) सकाळी 6 वाजल्यापासून तिचा दीक्षा घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. देवांशी जैनाचार्य कीर्तियशसूरीश्वर महाराज यांच्याकडून दीक्षा घेणार आहे. देवांशी ही दोन बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवांशी ही धनेश संघवी आणि त्यांची पत्नी अमी यांची मोठी मुलगी आहे. यांच्या दोन मुलींमध्ये देवांशी ही मोठी मुलगी आहे. देवांशी हिने आत्तापर्यंत 367 दीक्षा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. त्यानंतर तिने संन्‍यास घेण्‍याचा निर्णय घेतला असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. तिचे कुटुंब संघवी अँड सन्स नावाची हिरे कंपनी चालवते. ही कंपनी सर्वात जुन्या हिरे कंपन्यांपैकी एक आहे. प्रौढ झाल्यावर देवांशीला वारसाहक्काने कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळाली असती, मात्र तिने सर्व ऐषारामाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती तिच्‍या नातेवाईकांनी दिली.

देवांशीला अनेक भाषा अवगत

दिवांशीचे वडील हिरे व्यापारी धनेश आणि त्यांचं कुटुंब खूप श्रीमंत आहे. परंतु त्यांची जीवनशैली अतिशय साधी राहिली. त्यांचे घराणं सुरुवातीपासूनच धार्मिक आहे. 8 वर्षांच्या देवांशीला हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषा अवगत आहेत. इतकंच नाही तर देवांशी संगीतात पारंगत आहे. नृत्य आणि योगामध्येही ती खूप हुशार आहे.

दीक्षा विधी म्हणजे काय?

जैन धर्मातील दीक्षा घेणे म्हणजे सर्व भौतिक सुखसोयींचा त्याग करणे आहे. दीक्षा घेणाऱ्यांना तपस्वीचे जीवन जगावे लागते. भिक्षा मागून जीवन जगावे लागते. कुठलेही वाहन न वापरता पायीच प्रवास करावा लागतो. डोक्यावरील केस ब्लेड न वापरता स्वत:च्या हाताने ओढून काढावे लागतात.

लहान मुलं-मुली का घेताय दीक्षा

गेल्या काही वर्षांत जैन समाजात लहान मुलं, मुली कमी वयातच सन्यास घेत आहे. यामागील कारण म्हणजे त्यांचे कौटुंबिक वातावरण धार्मिक असते. त्यामुळे लहान वयातच आधात्माकडे मुलांचा ओढा वाढतो. भौतिक सुखसोयी मनशांती देऊ शकत नाही, म्हणूनच साधे जीवन स्विकारुन स्वतःला ईश्वरासाठी समर्पित करण्याचा निर्णय ही मुले-मुली घेत आहेत.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या