मुखपृष्ठ Uncategorized केंद्र सरकारचा मोठा निर्णय; या भरतीसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेणार परीक्षा

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; या भरतीसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेणार परीक्षा

by PNI Digital

मुंबई : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोंकणी भाषेत तयार केली जाईल.

या निर्णयामुळे लाखो इच्छूक उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल. कॉन्स्टेबल जीडी ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी उत्सुक असतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये 1 जानेवारी 2024 पासून परीक्षा घेतली जाईल.

स्थानिक तरुणांचा सहभाग वाढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

कधीपासून लागू होणार निर्णय

कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ही कर्मचारी निवड आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षांपैकी एक असून देशभरातून लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असतात. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये 1 जानेवारी 2024 पासून परीक्षा घेतली जाईल. या निर्णयामुळे लाखो इच्छूक उमेदवार त्यांच्या मातृभाषा/प्रादेशिक भाषेत परीक्षा देऊ शकतील आणि त्यांची निवड होण्याची शक्यता वाढेल. विविध भारतीय भाषांमध्ये परीक्षा आयोजित करणे सुलभ करण्यासाठी गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग विद्यमान सामंजस्य कराराच्या परिशिष्टवर स्वाक्षरी करेल.

 

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या