मुखपृष्ठ Top News जुनी नाणी-नोटा बनवतील तुम्हालाही श्रीमंत; जाणून घ्या काय आहे नेमका फंडा

जुनी नाणी-नोटा बनवतील तुम्हालाही श्रीमंत; जाणून घ्या काय आहे नेमका फंडा

by PNI Digital

मुंबई : काही लोकांना जुन्या नाणी आणि नोटा यांचा संग्रह करण्याचा छंद असतो. मात्र, आता या छंदातून चांगली कमाई देखील करता येणार आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल मात्र होय. जुनी नाणी आणि चलनी नोटांची ऑनलाइन विक्री करून तुम्ही एका रात्रीत श्रीमंत बनू शकता. सध्या 1 आणि 2 रुपयांची जुनी नाणी आणि 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयांच्या जुन्या नोटांना बाजारात चांगली मागणी आहे.

जुनी नाणी आणि जुन्या नोटांचा अभ्यास किंवा संग्रह करणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ नाणी आणि नोटांच्या शोधात असतात. तुमच्याकडे अशी नाणी किंवा नोटांचा संग्रह असल्यास ती विकून हवी चांगला मोबदला मिळवू शकता. चला तर मग, या नाण्यांविषयी आणि नोटांच्या विक्रीबद्दल अधिक जाणून घेऊ या.

‘या’ नाण्यांना आणि नोटांना आहे मागणी

– माता वैष्णोदेवीची प्रतिमा असलेली, अशी 5 आणि 10 रुपयांची नाणी तुमच्याकडे असतील, तर या नाण्यांना बाजारात मोठी मागणी आहे. ज्यांच्याकडे अशी नाणी आहेत, त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी लोक लाखो रुपये देण्यास तयार आहेत.

– तुमच्याकडे 1 रुपयाची जुनी नोट असेल तर तुम्ही 45 हजार रुपये कमावू शकता. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक रुपयाच्या नोटांचं बंडल 45 हजार रुपयांना विकलं जात आहे. 1957 सालचे गव्हर्नर एच. एम. पटेल यांची सही असलेल्या या नोटा असणं गरजेचं आहे. तसंच या नोटेचा अनुक्रमांक 123456 असणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर ओएनजीसीच्या (ONGC) 5 रुपये आणि 10 रुपयांच्या स्मारक नाण्यांसाठी 200 रुपये मिळत आहेत.

– तुम्ही शंभर रुपयांच्या नोटेसाठी 1,999 रुपये मिळवू शकता; मात्र ती नोट 000786 च्या असामान्य संख्यात्मक सीरिजची असावी. तसंच त्या नोटेवर आरबीआयचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची सही असावी, अशी अपेक्षा खरेदीदारांनी व्यक्त केली आहे.

– 1943 मध्ये जारी केलेली दहा रुपयांची नोट (ब्रिटिशांच्या काळातील) कॉइनबझारवर विकून तुम्ही पैसे मिळवू शकता. या नोटेवर आरबीआय गव्हर्नर सीडी देशमुख यांची सही आहे. तसंच या नोटेवर एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसऱ्या बाजूला एका जहाजाचा फोटो आहे. नोटेच्या मागच्या बाजूला दोन्ही टोकांवर “दहा रुपये” असं इंग्रजीत लिहिलेलं आहे. या दुर्मीळ नोटेच्या बदल्यात तुम्ही 25,000 रुपयांपर्यंत मोबदला मिळवू शकता.

– तुमच्याकडे 1862मधली क्वीन व्हिक्टोरियाची प्रतिमा असलेली नाणी असतील, तर त्यासाठी क्विकरवर खरेदीदार 1.5 लाख रुपये देण्यास तयार आहेत. 1862 मधलं एक रुपयाचं हे चांदीचं नाणं दुर्मीळ नाण्यांच्या प्रकारात मोडतं.

विक्री कुठे आणि कशी करायची?

अशा जुन्या नोटा आणि नाणी कॉइनबझार, इंडियामार्ट आणि क्विकर अशा बर्‍याच वेबसाइटवर विकली जाऊ शकतात. यावर विक्री करण्यासाठी तुम्ही प्रथम तिथे नोंदणी करणं आवश्यक आहे. स्वतःची माहिती भरल्यानंतर तुम्ही विक्री करू इच्छित असलेली नाणी किंवा नोटांचा तपशील द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या किमतीबद्दल माहिती द्यावी लागेल. यानंतर, इच्छुक खरेदीदार तुमच्याशी थेट संपर्क साधतील.

सूचना: वरील कुठल्याही वेबसाईटवर नोंदणी करताना अगोदर खात्री करून घ्यावी.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या