मुखपृष्ठ Top News छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिवसूत्र’; ज्याने बलाढ्य देशांनाही धुळ चारली

छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिवसूत्र’; ज्याने बलाढ्य देशांनाही धुळ चारली

by PNI Digital

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी अनेक लढाया ‘गनिमी काव्या’चा वापर करून केल्या. या तंत्राचा कौशल्यपूर्वक उपयोग शिवाजी महाराजांनी केला. मोंगल, आदिलशाही, निजामशाही आणि कुतूबशाही या सर्वच बलाढ्य शत्रूंशी सामना करताना शिवछत्रपतींचे लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य कमी पडत होते; मात्र महाराजांनी सह्याद्रीच्या दुर्गमतेचा उपयोग करत ‘गनिमी काव्या’चे युद्धतंत्र अवलंबून शत्रूला जेरीस आणले आणि हिंदवी स्वराज्य विस्तारले.

‘गनिमी कावा’ याला ‘शिवसूत्र’ असेही म्हटले जाते, कारण शिवाजी महाराजांनी केवळ गनिमी कावा शोधून काढला नाही तर जगात आजपर्यंत कोणीही करू शकले नाही इतके हे तंत्र विकसित केले. गनिमी कावाच्या अभ्यासातून छापामारीचे तंत्र शिकले आणि आपल्या मूठभर सैनिकांना प्रशिक्षित केले. या आधुनिक जगात जे जे नेते किंवा सेनापती जिंकले आहेत, त्या सर्वांनी गनिमी काव्याचे महत्व मान्य करत, शत्रूच्या सुपर पॉवरफुल सेनेलाही धुळ चारली आहे.

गनिमी काव्याने घडवली क्रांती

दुसऱ्या महायुद्धानंतर (विसाव्या शतकात) गनिमी कावाचे महत्त्व खूप मोठे होते. चीनमध्ये माओत्से तुंग आणि व्हिएतनाममध्ये जनरल ज्याप यांनी ‘गनिमी’ची सूत्रे अंगीकारून मोठे यश मिळवले. 1958 मध्ये क्युबाचा हुकूमशहा बतिस्ता विरुद्ध क्रांतिकारकांनी उठाव केला. क्रांतिकारकांचे नेतृत्व फिडेल कॅस्ट्रो, चे ग्युवेरा आणि त्यांचे सहकारी करत होते. हुकूमशहा बतिस्ताला उघडपणे महासत्ता अमेरिकेचे संपूर्ण सैन्य समर्थन मिळत होते, परंतु फिडेल कॅस्ट्रो आणि चे ग्युवेरा यांच्या गनिमांनी त्या महासत्तेला इतके जेरीस आणले की शेवटी त्याला माघार घ्यावी लागली.

आंतरराष्ट्रीय योद्धा म्हणून महाराजांची किर्ती

व्हिएतनामला अमेरिकेचा खूप त्रास झाला. मात्र, व्हिएतनामी जनरल ज्यापने घनदाट जंगलात भयंकर गनिमी युद्ध लढून अमेरिकन सैनिकांना थक्क केले. स्वत: जनरल ज्याप यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याला दिले. क्युबा आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांनी अमेरिकेवर मिळवलेल्या विजयात शिवाजी महाराजांच्या बौद्धिक संपत्तीने आपली जादू दाखवली. एक प्रकारे शिवरायांनीच अमेरिकेचा पराभव केला. अशा कामगिरीमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आंतरराष्ट्रीय योद्धा म्हणून इतिहासात नोंदवले जाते.

चीनमध्येही शिवरायांच्या तंत्राचा वापर

प्राचीन चिनी मार्शल आर्ट्स तज्ज्ञ सन त्झू यांनी त्यांच्या ‘बुक ऑफ द वॉर’ या पुस्तकात ‘गनिमी कावा’मध्ये दिलेल्या चढाईच्या डावपेचांची चर्चा केली आहे, ज्यामध्ये शत्रूला अचानक चकित करण्यासाठी प्रचंड वेगाने अचानक हल्ला कसा करायचा. लढाईच्या कोणत्या पद्धती आहेत?, शत्रूला फसवून कसे ठेवावे इत्यादी अनेक युक्त्या सांगताना त्यांनी ‘गनिमी कावा’ ची प्रशंसा केली आहे. जागतिक कीर्तीचे युद्ध-कला तज्ञ क्लाजविट्ज यांनीही त्यांच्या ‘ऑन वॉर’ या ग्रंथाच्या चौथ्या खंडात ‘गनिमी कावा’मध्ये वर्णन केलेल्या गनिमी युद्धाची चर्चा केली आहे.

नव्या समाजनिर्मितीची प्रेरणा

माओत्से तुंग, जनरल ज्याप आणि चे ग्यूवेरा हे तिघेही क्रांतिकारक होते, म्हणून त्यांनी ‘गनिमी कावा’ हेही क्रांतीच्या साधनांच्या दृष्टिकोनातून पाहिले. माओत्से तुंग यांच्या मते चिनी क्रांती ही मुळात शेतकऱ्यांची क्रांती होती, माओच्या गनिमी काव्यात शेतकरीच सैनिक होते. व्हिएतनाममध्येही जनरल ज्यापच्या नेतृत्वात शेतकरी आणि कामगारांनी उठाव केला. या क्रांतिकारकांनी ‘गनिमी युद्धा’च्या प्रेरणेचे सर्वाधिक श्रेय शिवाजी महाराजांना दिले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी लिहिले आहे की, त्यांना गनिमी काव्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली, आम्ही त्यांचे ऋणी आहोत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष ‘हो ची मिन्ह’ भारत भेटीवर आले असता म्हणाले, “व्हिएतनामच्या लोकांनी त्यांचे युद्ध ज्या प्रकारे लढले ते पाहून मी प्रभावित झालो आहे. मला शिवाजी महाराजांचा ‘गनिमी कावा’ आठवत राहिला. आम्ही शिवाजी राजांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास केला होता.”

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या