मुखपृष्ठ महाराष्ट्र पूज्य आचार्यश्री १०८ विद्या सागरजी महामुनिराज यांना दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे आदरांजली

पूज्य आचार्यश्री १०८ विद्या सागरजी महामुनिराज यांना दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे आदरांजली

by sitemanager

जळगाव – लोक भक्तीचे केंद्र, पूज्य आचार्य श्री १०८ विद्या सागरजी महामुनिराज यांचे आज पहाटे २.३० वाजता चंद्रगिरी तीर्थ डोंगरगड, (छत्तीसगड) येथे महानिर्वाण झाले.

परम आदरणीय विद्यासागरजी महाराज हे एक साधक आत्मा होते. त्यांच्या साधनेमुळे स्वकल्याण साधतच ते समाजाचे प्रेरणास्थान बनले होते. त्यांचे महानिर्वाण निमित्त दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळ संचलित महिला मंडळातर्फे नमोकार महामंत्राचे जाप करीत आदरांजली अर्पण करण्यात आली. राजलक्ष्मी शरद जैन यांचे मोहाडी रोडवरील घरी हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या